पुण्यात पवळेचौक ते कुंभारवेस परिसरात जमावबंदी


पुणे : सार्वजनिक शांतताभंग आणि कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता वाटत असल्याने पोलिसांनी पुण्यातील पवळेचौक ते कुंभारवेस परिसरात दंडप्रक्रिया संहिता कलम १४४(१) लागू केले आहे. तसे आदेश पोलीस सहआयुक्त प्रवीण पवार यांनी जारी केले आहेत. २८ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत हे आदेश लागू राहणार आहेत.

या परिसरात काही दिवसांपूर्वी सार्वजनिक शांतताभंग होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पुन्हा या भागात बाहेरील व्यक्ती प्रक्षोभक वक्तव्ये, आक्षेपार्ह घोषणाबाजी, चिथावणीखोर वक्तव्ये सोशल मीडिया व अन्य माध्यमांद्वारे करण्याची शक्यता पोलिसांना वाटत असल्याने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.या आदेशान्वये पवळेचौक ते कुंभारवेस सार्वजनिक रस्त्यावर तसेच भोईगल्ली, कागजीपुरा, कुंभारवाडा, आलोकनगर सोसायटी व अग्रवाल तालीम येथील सार्वजनिक रस्त्यांवर स्थानिक नागरिकांखेरीज बाहेरील व्यक्तींना प्रार्थनेकरीता, आरतीकरीता एकत्र येण्यास, या परिसरात प्रवेश करण्यास, थांबून राहण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

या शिवाय संपूर्ण पुणे शहरात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील किंवा विभिन्न जातीधर्माच्या दोन गटामध्ये तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य, वक्तव्य करण्यास व अफवा पसरवण्यास,  जातीय भावना भडकवणारे आक्षेपार्ह संदेश समाजमाध्यमाद्वारे प्रसारित करण्यास, विनापरवाना कोणतीही रॅली, धरणे, मोर्चाचे किंवा कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

पुण्यात पवळेचौक ते कुंभारवेस परिसरात जमावबंदी पुण्यात पवळेचौक ते कुंभारवेस परिसरात जमावबंदी Reviewed by ANN news network on ३/२९/२०२४ ०८:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".