३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस
पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट ६ च्या पथकाने एका सराईत घरफोड्याला अटक करून त्याच्याकडून १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यामुळे वानवडी आणि लोणीकाळभोर पोलीसठाण्याच्या हद्दीतील ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
कुणाल ऊर्फ बाब्या प्रल्हाद ठाकूर वय २३ वर्षे रा. गोसावीवस्ती, बिराजदारनगर, हडपसर, पुणे असे या सराईताचे नाव आहे.
२६ मार्च रोजी गुन्हेशाखेचे पथक गस्त घालत असताना कुणाल ठाकूर इंद्रप्रस्थ लॉन्सकडून भापकरमळयाकडे जाणार्या रस्त्यावर येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली.पोलीसपथकाने तातडीने तेथे जात त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने सापडले. त्याला ताब्यात घेऊन'नीट' चौकशी केली असता त्याने वरील तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर येरवडा, हडपसर, लोणावळा आदी पोलीसठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस उपआयुक्त गुन्हे, अमोल झेंडे, सहायक आयुक्त, गुन्हे २ सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे निरीक्षक उल्हास कदम,अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, शेखर काटे ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: