२ ऑक्टोबर रोजी पुण्यात आयोजन
पुणे :'विवेकानंद केंद्र कन्याकुमारी' तर्फे २ ऑक्टोबर रोजी पुण्यात 'नॉर्थ ईस्ट कॉलिंग' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नॅसकॉमचे माजी अध्यक्ष डॉ.गणेश नटराजन हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून 'इग्नाईटिंग यंग माईंड्स फॉर नेशन बिल्डिंग' या विषयावर बोलणार आहेत. 'विवेकानंद केंद्र कन्याकुमारी' च्या राष्ट्रीय उपाध्यक्षा निवेदिता भिडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. त्या 'नेशन बिल्डिंग वर्क ऑफ विवेकानंद केंद्र विथ रिस्पेक्ट टू नॉर्थ ईस्ट' हा विषय मांडणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता स.प.महाविद्यालयाचा लेडी रमाबाई हॉल येथे होणार आहे. 'विवेकानंद केंद्र कन्याकुमारी' चे महाराष्ट्र प्रांत प्रमुख किरण कीर्तने ,खजिनदार प्रवीण दाभोळकर हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.
'विवेकानंद केंद्र कन्याकुमारी 'तर्फे 'नॉर्थ ईस्ट कॉलिंग प्रोग्रॅम '
Reviewed by ANN news network
on
९/२६/२०२३ ०९:३८:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/२६/२०२३ ०९:३८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: