शिवराय मित्र मंडळाने साकारला लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींचा देखावा

 


पिंपरी  : पिंपळे गुरव येथील शिवराय मित्र मंडळाच्या वतीने लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींचा देखावा सादर करताना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना अनोखी श्रद्धांजली देण्यात आली. मंडळाचे हे ३६ वे वर्ष असून मंडळांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

शिवराय मित्र मंडळाच्या वतीने जगताप यांच्या विविध फोटोंचे कोलार्जचा देखावा करण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या संघर्ष कालापासूनचे विविध फोटो यामध्ये उपलब्ध आहेत. या फोटोच्या माध्यमातून जगताप यांचा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, आमदार, भाजप शहराध्यक्ष असा छायांकित प्रवास उलघडून दाखविण्यात आला आहे.

पिंपळे गुरव येथील अनेक मित्रमंडळांचे जगताप यांच्याशी ऋणानुबंध होते. आध्यात्मिक वारसा जपणारे आमदार जगताप यांनी अनेक मंडळांना स्थिरस्थावर करण्यासाठी सढळहस्ते मदत देखील केली. यामुळे अनेक मंडळे हक्काने जगताप यांच्याकडे येत असत. आलेल्या मंडळांना व त्यांच्या प्रतिनिधींची भाऊ आपुलकीने चौकशी करत असत. आज जगताप नसले तरी आजही अनेक मंडळे ठामपणे उभी आहेत, कारण त्यांचा वारसा शहराध्यक्ष शंकर जगताप चालवत आहेत, असे मंडळाचा देखावा सादर करणारे शिवाजी रावडे यांनी बोलताना सांगितले.


अभिजित देवकर, संदीप जांभूळकर, विशाल कदम, रवी जगताप, ज्ञानेश्वर बिरादार, श्रीकांत पाचारणे, आशिष कवडे, संदेश कदम, रुपेश नवले, शंतनू धनवटे, अक्षय कदम, महेश देवकर, शुभम कदम, चिराग जगताप, आकाश जगताप, सुरज जगताप, किरण जगताप, स्वराज कदम, पृथ्वी जगताप, ज्ञानेश कदम, वैभव सुतार, आतिश जांभूळकर, अक्षय जाधव, प्रणव जगताप, प्रतिक कवडे, , प्रसाद गुंजाळ, मोहित बनकर, अण्णा लोहार, रुपेश नवले, स्वप्नील घुले, अथर्व देवकर, अमर कदम, शुभम गायकवाड, अमित शिंदे, शंकर चव्हाण आदी कार्यकर्ते यांनी उपक्रमासाठी पुढाकार घेतला.



शिवराय मित्र मंडळाने साकारला लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींचा देखावा शिवराय मित्र मंडळाने साकारला लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींचा देखावा Reviewed by ANN news network on ९/२६/२०२३ ०९:४१:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".