स्व अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांच्या आणलेला माथाडी कायदा प्रत्येक कामगार यांनी अभ्यासाला पाहिजे तेच खरे त्यांच्या स्मृतीला व विचारांना अभिवादन असेल - इरफान सय्यद
पिंपरी : माथाडी कामगारांचे दैवत स्व.अण्णासाहेब पाटील यांची जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन. आज खऱ्या अर्थाने साहेबाच्या विचाराना प्रमाण मानून कष्टकरी माथाडी हमाल मापडी कामगाराच्या करिता कार्य करणारे सरकार राज्यात प्रस्थापित झाले असे वाटते कारण पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९ यात बदल करण्यासाठी काही सुधारणा करण्यासाठी विधिमंडळ मध्ये विधेयक ठेवण्यात आले आहे. त्या विधेयकामध्ये सुधारणा करण्यासाठी काही सूचना माथाडी कामगार, संघटना यांना ६ ऑक्टोबर पर्यंत मागविण्यात आल्या तरी जास्तीत जास्त संख्येने आपल्याला भेडसावत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी त्यावरील योग्य सूचनेसह राज्य सरकार यांना पाठवाव्यात हीच आजच्या दिवशी सर्व माथाडी बांधव यांना विनंती करीत आहे.
कष्टकरी गोरग़रीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी आपले आयुष्य वेचणार्या अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त चिंचवड येथील अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार नेते इरफानभाई सय्यद, परेश मोरे, प्रवीण जाधव, भिवाजी वाटेकर, पांडुरंग काळोखे, सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, सतीश कंठाळे,नागेश व्हणवटे, दादा कदम, समर्थ नाईकवाडे, अमित पासलकर, गोरक्षनाथ दुबाले, बबन काळे, संपत मांढरे, अशोक साळुंखे, ज्ञानेश्वर घनवट, गिरीश देशमुख,चंद्रकांत पिंगट, सोमनाथ फुगे, संदीप जांभळे,रोहित नवले, बालाजी खैरे,विकास साळुंखे,सुनील खोपडे ,राहुल मांडवे, विनोद जाधव,सोमनाथ देशमुख, निलेश चतुर, सचिन प्रचंड, संतोष पवार, नवनाथ नरळे, अमर सय्यद, अक्षय कदम, गणेश देवडकर, अतुल फरतडे, युवराज पोतेकर, सूरज भोसले, चंदन वाघमारे, रत्नाकर भोजने व असंख्य कामगार मोठ्या संख्यने उपस्थित होते.
अभिवादन करताना कामगार नेते इरफान सय्यद म्हणाले की , स्व.अण्णासाहेब पाटील यांनी लाखो कष्टकरी माथाडी , मापाडी कामगार यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले . पाटण तालुक्यातील मुंदुळ कोळे यागावी जन्मलेल्या अण्णासाहेब यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी मुबई गाठली. मुंबईत आल्यावर तेथे उसाच्या चारकावर आपल्या कष्टकरी जीवनाला प्रारंभ केला.नंतर दारुखाणा येथे ओझे उचलण्याची कामे केली.ही कामे करत असताना कामगारांना मिळणारा मोबदला , मालकाकडून होणारी पिळवणूक पाहून त्यांचे मन तळमळत असे त्या तळमळीतून माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा त्यांनी चालू केला. व पुढे अनेक राजकीय नेत्यांकडे सरकार दरबारी पत्रव्यवहार पाठपुरावा करून माथाडी कायदा अमलात आणला . त्यामुळे माथाडी कामगारांना न्याय मिळून आज माथाडी संघटन हे एक बलाढ्य संगटन म्हणून नावारूपाला आले अण्णासाहेब पाटील यांनी गोरगरीब कष्टकरी माथाडी कामगारांच्या करिता केलेलं कार्य हे एका दीपस्तंभ सारखे आहे. माथाडी कामगारांच्या कुटुंबीक , आर्थिक सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल होण्यासाठी स्व अण्णासाहेब पाटील यांचे योगदान खूप मोठे आहे.त्याचे कार्य नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी राहील.
सध्या माथाडी मध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मुळे माथाडी कामगार व कायदा बदनाम झाला आहे. गाव खेड्यातून आलेला आमचा माथाडी कामगार कधीही दादागिरी करीत नाही. प्रामाणिकपणे काम तो करुन श्रमाचा मोबदला मागतो. चुकीचे लोक माथाडीच्या नावाखाली कंपनी व्यवस्थापनाला व माथाडी कामगारांना वेठीस धरतात. पिंपरी- चिंचवड ही कामगारनगरी आहे. काही संघटनांच्या त्रासाला कंटाळून कंपन्या स्थलांतरित होत आहेत, हे थांबले पाहिजे. उद्योग टिकले तरच कामगार टिकेल, असे मत महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते इरफान सय्यद यांनी व्यक्त केले.
Reviewed by ANN news network
on
९/२६/२०२३ १०:०९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: