फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रा. लि. कंपनीला आयएसीसीतर्फे ‘आउटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युटर टु द इंडो- युएस कॉरिडॉर’ सन्मान प्रदान
पुणे : फ्लीटगार्ट फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड (एफएफपीएल) या भारतातील ऑन- ऑफ हायवे अॅप्लिकेशन्स उच्च दर्जाच्या फिल्टरेशन सुविधा तयार करणाऱ्या कंपनीला नुकत्याच झालेल्या १९ व्या इंडो अमेरिकन कॉर्पोरेट एक्सलन्स (आयएसीई) अवॉर्ड्स २०२३ मध्ये ‘आउटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युटर टु द इंडो- युएस कॉरिडॉर’ सन्मान देण्यात आला.
इंडो अमेरिकन कॉर्पोरेशन एक्सलन्स अवॉर्ड्सतर्फे भारत- अमेरिका व्यापाराचा प्रसार करणाऱ्या आणि व्यवसाय, उद्योग व एकंदर समाजासह कॉर्पोरेट यंत्रणेतील सर्व क्षेत्रांसाठी असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कामाची दखल
घेतली जाते. फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रा. लि. कंपनीला भारतीय व जागतिक ग्राहकांना फिल्टरेशनच्या अत्याधुनिक सुविधा पुरवण्याचा दीर्घ वारसा लाभला आहे. हा पुरस्कार व्यावसायिक हितसंबंध मजबूत करण्याच्या आणि भारत- अमेरिका दरम्यान आर्थिक विकासाला चालना देण्याचे कंपनीचे अथक प्रयत्न अधोरेखित करणारा आहे.
एफएफपीएलने सातत्याने नाविन्य, दर्जा व ग्राहक समाधानाप्रती आपली बांधिलकी दाखवून दिली आहे. कंपनीच्या अत्याधुनिक सुविधा वैविध्यपूर्ण उद्योगांसाठी पुरवल्या जातात व त्यात वाहन, शेती, वीज निर्मिती, बांधकाम आणि पायाभूत सुविधा, खाणकाम आणि संरक्षण यांचा समावेश आहे. त्यामुळे या उद्योगांना प्रदुषणाशी संबंधित आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करण्यास व आपली कार्यक्षमता उंचावण्यास मदत होते. पर्यायाने कंपनीतर्फे पर्यावरणीय शाश्वततेसाठी मोठे योगदान दिले जाते. हा पुरस्कार कंपनीच्या गुणवत्तेचा ध्यास धरण्याच्या आणि जागतिक फिल्टरेशन उद्योगात नाविन्य आणण्याच्या वृत्तीचे प्रतीक आहे.
श्री. मायकेल श्रुडर, उप प्रमुख अधिकारी, युएस कौन्सुलेट जनरल, मुंबई यांनी श्री. वैभव पाठक, सहाय्यक अध्यक्ष- ऑपरेशन्स, फ्लीटगार्ट फिल्टर्स प्रा. लि. आणि श्री. पियुष श्रीवास्तव, प्रमुख – कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि ब्रँडिंग, फ्लीटगार्ट फिल्टर्स प्रा. लि. यांना हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष आणि १९ व्या इंडो अमेरिकन कॉर्पोरेट एक्सलन्स पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे २०२३ श्री. एस. एस. मुद्रा उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: