भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ' नक्षत्रवृक्ष ' या अभिवाचन कार्यक्रमातून 'ना. मा. संत, इंदिरा संत आणि प्रकाश संत ' या मराठी साहित्यातील त्रयींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला...
शनिवार,८ जुलै २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम पार पडला.
सेतू अभिवाचन मंच, पुणे यांची ही प्रस्तुती होती.'ना. मा. संत, इंदिरा संत आणि प्रकाश संत ' या मराठी साहित्यातील त्रिदलाला समर्पित हा कार्यक्रम होता.
संकल्पना आणि संहिता गीतांजली अविनाश जोशी यांची होती. दिग्दर्शन अनिरूध्द दडके यांचे होते. व्हायोलिनवादन अनुप कुलथे यांचे होते.
अनिरुद्ध दडके, मुकुंद दातार, दीपाली दातार आणि गीतांजली जोशी यांनी अभिवाचन केले.. आणि उपस्थितांना जुन्या काळाची, साहित्याची सैर घडवून आणली.
ना. मा संत, इंदिरा संत आणि प्रकाश नारायण संत ह्या तीन ख्यातनाम साहित्यिकांच्या दुर्लभ साहित्याचे अभिवाचन केलेच ,परंतु ,आई वडील आणि मुलगा यांच्यातल्या नात्यांचे त्यांच्या साहित्यातले प्रतिबिंबही श्रोत्यांपर्यंत पोचले.
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. हा कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर झालेला हा १७१ वा कार्यक्रम होता .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: