पुणे : देशभरातील नेत्रतज्ज्ञांच्या चेन्नई येथे झालेल्या 'इंडियन इंट्राऑक्युलर इम्प्लांट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी कन्व्हेंशन -२०२३' या राष्ट्रीय परिषदेमध्ये पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफथाल्मोलॉजी चे संस्थापक आणि ज्येष्ठ नेत्रशल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत केळकर यांचा सत्कार करण्यात आला.
इंडियन इंट्राऑक्युलर इम्प्लांट अँड रिफ्रॅक्टिव्ह सोसायटी ऑफ इंडिया च्या वतीने ८ आणि ९ जुलै रोजी ही परिषद आयटीसी ग्रॅंड चोला(चेन्नई) येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये दोन चर्चासत्रांचे अध्यक्षस्थान केळकर यांनी भूषवले, तसेच संशोधनपर शोधनिबंध ही सादर केला. नेत्रशल्यचिकित्सा क्षेत्रातील ५० वर्षांच्या योगदानाबद्दल यावेळी डॉ.केळकर यांचा सत्कार करण्यात आला. देशभरातून ४०० तज्ज्ञ उपस्थित होते.
नेत्रतज्ज्ञांच्या चेन्नई परिषदेमध्ये डॉ. श्रीकांत केळकर यांचा सत्कार
Reviewed by ANN news network
on
७/०८/२०२३ ०६:३९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: