• पॉवर एसआयपी सुविधा पद्धतशीर गुंतवणूक योजनेची (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन -एसआयपी) तसेच पद्धतशीर पैसे काढण्याची योजनेची (सिस्टीमॅटिक विड्रॉअल प्लॅन- एसडब्ल्यूपी) वैशिष्ट्ये आणि लाभ एकत्र करते• पॉवर एसआयपी सुविधा गुंतवणूकदाराला आज पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्यास आणि पूर्वनिर्धारित कालावधीनंतर नियमित अंतराने निश्चित रक्कम काढण्यास सक्षम करते.
मुंबई : महिंद्रा मॅन्युलाइफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडाच्या योजनांतर्गत "पॉवर एसआयपी" नावाची नवीन सुविधा सुरू करण्याची घोषणा केली. ही सुविधा सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन -एसआयपी तसेच सिस्टीमॅटिक विड्रॉअल प्लॅन- एसडब्ल्यूपी वैशिष्ट्ये आणि लाभ एकत्र करते. यामुळे गुंतवणूकदारांना स्थिर उत्पन्नाच्या (एसडब्ल्यूपी) प्रवाहाच्या रूपात चक्रवाढ शक्तीचा (एसआयपी) जास्तीत जास्त लाभ घेण्यास सक्षम केले जाते.
महिंद्रा मॅन्युलाइफचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अँथनी हेरेडिया म्हणाले, “आर्थिक स्वातंत्र्य ही व्यक्ती आणि कुटुंबांसाठी मूलभूत आकांक्षा असते याची आम्हाला जाणीव आहे. पॉवर एसआयपी सुविधेसह आम्ही एक सर्वसमावेशक उपायसुविधा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे केवळ संपत्ती संचयनाची सुविधा मिळते असे नाही तर पैसे काढण्याच्या टप्प्यातही सहजता येईल हे सुनिश्चित होते. सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी) द्वारे, आमचे ग्राहक त्यांच्या गुंतवणुकीच्या संभाव्य वाढीचा लाभ घेत असतानाच नियमित उत्पन्नाचा आनंद घेऊ शकतात.”
या सुविधेसह, गुंतवणूकदार आता विशिष्ट कालावधीसाठी फंडाच्या पात्र योजनांमध्ये एसआयपी आणि एसडब्ल्यूपी मध्ये नोंदणी करून त्यांच्या गुंतवणूक प्रवासाची योजना करू शकतात. ही सुविधा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: पर्याय अ, जेथे एसआयपी आणि एसडब्ल्यूपी दोन्ही एकाच योजनेत नोंदणीकृत आहेत आणि पर्याय ब, जेथे एसआयपी आणि एसडब्ल्यूपी वेगवेगळ्या पात्र योजनांमध्ये नोंदणीकृत केले जाऊ शकतात.
ए हा पर्याय गुंतवणूकदारांना एसआयपी आणि एसडब्ल्यूपी दोन्हीसाठी समान योजना निवडण्याची परवानगी देऊन प्रक्रिया सुलभ करतो. या बाबतीत एकदा का एसआयपीचा कार्यकाळ संपला की पॉवर एसआयपी सुविधेद्वारे जमा झालेली संपूर्ण युनिट्स एसडब्ल्यूपी साठी उपलब्ध होतात, ज्यामुळे गुंतवणूक आणि पैसे काढण्याच्या टप्प्यांमध्ये अखंड विनाअडथळा प्रवाह सुनिश्चित होतो. दुसरीकडे, पर्याय ब ग्राहकांना हवे त्या प्रकारे सुविधा देत आणखी एक उंचीवर नेतो.
एसआयपी ते एसडब्ल्यूपी मधील सहज विनाअडथळा प्रवाह सुलभ करण्यासाठी सुविधेत चार भिन्न टप्पे समाविष्ट आहेत:
पहिला टप्पा: गुंतवणूकदार त्यांच्या पसंतीच्या पात्र स्त्रोत योजनेमध्ये ८ ते ३० वर्षांपर्यंतच्या पूर्वनिर्धारित कालावधीसाठी मासिक तत्वावर एसआयपी साठी नोंदणी करतात.
दुसरा टप्पा: विशिष्ट एसआयपी कालावधी पूर्ण केल्यानंतर, सुविधेद्वारे जमा झालेल्या उपलब्ध युनिट्सपैकी ८०% अंतिम एसआयपी हप्त्याच्या तारखेपासून १५ कॅलेंडर दिवसांच्या शेवटी लागू एनएव्हीवर आधारित (किंवा, जर स्विचचा दिवस सुट्टीचा दिवस असल्यास पुढील व्यावसायिक दिवशी) एसडब्ल्यूपी साठी निवडलेल्या उद्दिष्ट योजनेवर स्विच केले जातात. उपलब्ध युनिट्सपैकी उर्वरित २०% स्त्रोत योजनेमध्ये गुंतवलेली राहतात.
तिसरा टप्पा: एसडब्ल्यूपी उत्पन्न एसआयपी कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरच्या महिन्यापासून लक्ष्य योजनेतून सुरू होईल. एसडब्ल्यूपी तारीख एसआयपी तारखेसारखीच असेल.
चौथा टप्पा: प्रारंभिक स्विच व्यवहारानंतर (दुसऱ्या टप्प्यात नमूद केल्याप्रमाणे) तीन वर्षे पूर्ण झाल्यावर, सुविधेद्वारे जमा झालेल्या उपलब्ध युनिट्सपैकी उर्वरित २०% लागू NAV वर लक्ष्य योजनेवर स्विच केले जातील. हे एकतर स्विचच्या दिवशी किंवा जर स्विचचा दिवस सुट्टीचा दिवस असल्यास पुढील व्यावसायिक दिवशी दिवस व्यवसाय नसलेल्या दिवशी आला तर पुढील व्यावसायिक दिवशी स्विच होतील. ही उर्वरित युनिट शिल्लक मासिक एसडब्ल्यूपी हप्त्यांवर प्रक्रिया करण्यासाठी देखील विचारात घेतली जाईल.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारपेठेतील जोखमीच्या अधीन असते, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.
महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडातर्फे 'पॉवर एसआयपी सुविधा' सादर
Reviewed by ANN news network
on
७/११/२०२३ १२:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: