२० ऑगस्ट रोजी पुण्यात राष्ट्रीय पुरस्कार वितरण
पुणे : डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.शैक्षणिक,सामाजिक,सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.सन्मानचिन्ह,मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील,समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचाही सत्कार या देशपातळीवरील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.'प्रेस मीडिया लाईव्ह' संस्थेच्या वतीने हा पुरस्कार २० ऑगस्ट २०२३ रोजी आझम कॅम्पस येथे देण्यात येणार आहे.'प्रेस मीडिया लाईव्ह' संस्थेचे प्रमुख मेहबूब सर्जेखान यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार
Reviewed by ANN news network
on
७/११/२०२३ १२:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: