मुंबई : नोकरी करणारा माणूस ५८ व्या वर्षी निवृत्त होतो. आयएएस, आयपीएस ६० व्या वर्षी निवृत्त होतात. राजकारणात भाजपमध्ये ७५ व्या वर्षी निवृत्त व्हावे लागते. तुमचे वय ८३ झाले मग आता तुम्ही थांबणार की नाही? तरुणांना संधी कधी देणार? असे प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर ५ जुलै रोजी टीका केली.
अजित पवार गटाची बैठक मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या पटांगणात पार पडली या बैठकीत अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, २००४ साली राष्ट्रवादीचे ७१ आमदार निवडून आले होते. तेव्हाच मुख्यमंत्रीपद घेतले असते तर आजवर राज्यात राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री राहिला असता. मलाही वाटते की राज्याचा प्रमुख व्हावे. तुम्ही आशीर्वद द्या. चुकले तर सांगा. चूक सुधारून पुढे जाऊ. अता नव्या पिढीला राजकारणात पुढे येऊ द्या. आज थोडेच बोललो आहे. पण, पुढे सभा झाल्या तर मला अधिकही बोलावे लागेल असा गर्भित इशाराही अजित पवार यांनी शरद पवार यांना दिला.
दरम्यान, अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज करत आपलाच गट अधिकृत राष्ट्रवादी असल्याचा दावा केला असून त्या सोबत ४० आमदारांच्या पाठिंब्याची शपथपत्रेही दाखल केली असल्याचे वृत्त आहे. तर शरद पवार यांच्या गटाने या अर्जावर निवडणूक आयोगाने निकाल देण्यापूर्वी आपले म्हणणे ऐकून घ्यावे असा अर्ज दाखल केला आहे.
Reviewed by ANN news network
on
७/०६/२०२३ १२:०८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: