राष्ट्रवादीतील वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठरावाद्वारे अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संबंधित कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहेत. या आशयाचा ठराव पक्षाच्या आमदारांनी एकमताने मंजूर केल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवार गटाने संपूर्ण राष्ट्रवादीवरच दावा केल्याचे स्पष्ट झाले आहे.

अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी मान्यता देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांनी आज (बुधवारी) राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र निवडणूक आयोगाकडे सादर केल्याची माहिती मिळाली आहे. आणि पक्षाच्या बहुसंख्य आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

शरद पवार यांच्या गटानेही निवडणूक आयोगाकडे अर्ज सादर केला. शरद पवार यांच्या अर्जात निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत एकतर्फी निर्णय घेऊ नये, निर्णय घेण्यापूर्वी  आपल्या यांच्या गटाची बाजू ऐकून घ्यावी असे अर्जात म्हटले आहे.

राष्ट्रवादीतील वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला राष्ट्रवादीतील वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला Reviewed by ANN news network on ७/०५/२०२३ ०६:१२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".