पुणे : अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीशी हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, पक्षात फूट पडल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि विशेषतः कार्यकर्ते अजूनही संभ्रमात आहेत. पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
दरम्यान दरम्यान, अजित पवार यांच्या गोटातील पुणे शहराध्यक्षपदी नियुक्तीबाबत चर्चा सुरू झाली आहे. पुणे शहराध्यक्षपदासाठी दीपक मानकर आणि महिला शहराध्यक्षपदी रुपाली ठोंबरे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आज, दुपारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या गटाने पुण्यातील शहर कार्यालयासाठी जागेचा शोध सुरू केला आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, दीपाली धुमाळ, काका चव्हाण, सायली वांजळे, कमल ढोले पाटील, मृणालिनी वाणी, गणेश नलावडे, किशोर कांबळे, बाळासाहेब रायकर, शरद दबडे, महेश हांडे, डॉ. पोकळे, सुरेखा धनिष्टे, विक्रम जाधव आदी नेते शरद पवार यांच्यासोबत आहेत.
तर, अजित पवार समर्थकांमध्ये आमदार सुनील टिंगरे, राजलक्ष्मी भोसले, दीपक मानकर, आनंद अलकुंटे, दत्ता धनकवडे, युवराज बेलदरे, प्रकाश कदम, बाबुराव चांदेरे, सुभाष जगताप, महेंद्र पठारे, प्रमोद निम्हण, बाळासाहेब बोडके, विनोद मोरे, सुनंद मोरे, सुनील शेंडे, विकास दांगट, बाबा धुमाळ, गणेश घुले, प्रशांत म्हस्के, शंकर कामसे, रोहिणी चिमटे यांचा समावेश आहे.
Reviewed by ANN news network
on
७/०६/२०२३ ०१:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: