पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर भागात घराबाहेर खेळत असलेल्या एका आठ वर्षाच्या मुली खेळताखेळता उघड्या डीपीला हात लावला. यामुळे तिला जोराचा विजेचा धक्का बसून ती गंभीररित्या भाजली.
हा प्रकार पिंपळे सौदागर येथे असलेल्या जगताप कॉलनीमध्ये घडला. या प्रकरणी जखमी मुलीचे वडील आनंद विजयकुमार उमर्जीकर (वय 32, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार तक्रारदाराची मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत खेळत होती. खेळत असताना ती सार्वजनिक शौचालयाजवळ असलेल्या इलेक्ट्रिक डीपीच्या कंपाउंडमध्ये गेली. तिथे तिचा हात उघड्या डीपीला लागला यात ती गंभीरित्या भाजली असून महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डीपीला तार कंपाउंड न केल्याने तसेच डीपी व्यवस्थित बंद न केल्याने हा अपघात घडला अशास्वरुपाची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: