मंदार आपटे
खेड : मे महिना म्हटला की, अभ्यासाला सुट्टी, फक्त खाणं, खेळणं आणि फिरायला जाणं हे मुलांचं ठरलेल सूत्र मात्र हल्ली काळ बदलला; वेळ बदलली. खेळाची साधनेही बदलली. पूर्वी पळती झाडे पाहुया ! मामाच्या गावाला जाऊया ! या गाण्याच्या ओळी नुसार १ मे चा निकाल लागला की, मुले आपल्या आजोळी जात.
मामाच्या गावाला जाऊन आंबे, फणस, करवंद, काजू, जांभळे खाण्यासाठी बागेत दिवस दिवस भर फिरत असायची मुलांन बरोबर बागडून संध्याखाली चांदोमामाच्या गोष्टी ऐकत झोपी जायचे. मात्र आता काळ बदलला आहे झाडावर दगड मारून आंबा चिंचा काढणारे हात आता मोबाईलच्या बटनानवर विसावू लागलेत.
आता उन्हाळ्याच्या सुट्टीत वॉटर पार्क, तबला पेटी क्लास, कराटे क्लास, योग क्लास, संगीत क्लास, आदी क्लास मध्ये दिवसातील काही तास मुलांना पाठविले जात आहे. उन्हाळी शिबिरांमध्ये मुलांना पाठविण्यामुळे आजोळी जाण्याची ओढ हळूहळू कमी होत चालली आहे.
सध्या अनेक खाजगी संस्था आकर्षक जाहिरातबाजी करून अनेक मुलं आपल्याकडे आकर्षित करून २-३ तास क्लास चालवत आहेत. मुले उर्वरित वेळ हा बदललेल्या संस्कृती व बदललेले राहणीमान यानुसार आपल्या घरातच व्हिडीओ गेम, मोबाईल, संगणक या वरती खेळ खेळून आपले मन रमवित आहेत. पूर्वी सारखे आता आजोळी प्रत्यक्षात न जाता व्हिडीओ कॉल वरून मामाजवळ बोलत सुट्टीतील मे महिना साजरा करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: