महेंद्र मांडवकर यांची नियुक्ती

मंदार आपटे 
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) कायदा आघाडी प्रमुख म्हणून महेंद्र वसंत मांडवकर यांची नियुक्ती भाजपचे जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन यांनी केली आहे. 
महेंद्र मांडवकर सन २०२० सालापासून भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) चे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
          सन २०००-२००१ सालापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेच्या संपर्कात व तेव्हापासून विद्यार्थी परिषदेच्या विविध जबाबदाऱ्या घेतल्या. नुकत्याच फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या  यूथ समिट या जिल्हास्तरीय संमेलनाचे सहसचिव म्हणून काम पाहले. तर लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे सन २०१४ सालापासून सदस्य व लायन्स च्या विविध उपक्रमात सहभागी होत लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे ते सदस्य आहेत.
         कॉलेज जीवनात राष्ट्रीय सेवा समिती (एन.एस.एस) चे काम केले आहे. रिमांड होम रत्नागिरीच्या कार्यकारिणीत सदस्य. सामाजिक सेवेची आवड असल्यामुळे रत्नमित्र फाउंडेशन या एन जी ओ ची स्थापना करून विविध सामाजिक उपक्रम ते राबवतात. महेंद्र वसंत मांडवकर सन 2008 सालापासून वकिली क्षेत्रात कार्यरत असून रत्नागिरी  बार असोसिएशनचे सह 
सचिव म्हणून सन २०१३-१४ ते २०१५-१६ पर्यंत कामकाज पाहिले आहे
महेंद्र मांडवकर यांची नियुक्ती महेंद्र मांडवकर यांची नियुक्ती Reviewed by ANN news network on ३/०९/२०२३ १२:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".