नवी मुंबई :आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज कोकण भवन येथे साजरी करण्यात आली. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कोंकण भवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दर्पण या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे, इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्च विद्याविभूषित, पंडिती व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. 19 व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा मोठा वाटा होता.
कोंकण भवनात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन
Reviewed by ANN news network
on
२/२०/२०२३ ०९:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: