मंदार आपटे
दापोली : दापोली तालुक्यातील हर्णे येथे आंजर्ला खाडीतील गाळ काढणे व ग्रोयान्स पद्धतीचा बंधारा बांधणे या कामाचे भूमिपूजन सोमवारी आमदार योगेश कदम, शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते झाले.
सदर कामांसाठी कोळी बांधवांनी मागणी केली असता शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून ५६ कोटी ८७ लाख ३८ हजार ४५ रुपयांचा भरीव निधी मंजूर करून घेतला आहे. कोळी बांधवांच्या मागणीला नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देऊन आजवर विविध कामे पूर्णत्वास आणली आहेत.
सदरील काम पूर्ण झाल्यावर कोळी बांधवांना बोटी अडकल्याने ज्या त्रासाला सामोरे जावे लागत होते तो त्रास नाहीसा होणार आहे, त्यामुळे मोठा दिलासा त्यांना मिळणार आहे. या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम झाल्याने समस्त कोळी बांधवांनी समाधान व्यक्त केले. यापुढेही अशीच विविध विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले.
याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: