पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांचे हस्ते आज सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील झालेल्या या कार्यक्रमास सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, उप आयुक्त रविकिरण घोडके, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अभियंता किशोर महाजन, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण नावाचे पहिले वृत्तपत्र सुरु केले. स्वातंत्र्यपूर्व काळातील पारतंत्र्याने ग्रासलेला देश, अनिष्ठ रूढी, परंपरा, चालीरिती, अज्ञान, अंधश्रद्धा अशा प्रकारांना वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन होऊन प्रतिबंध व्हावा हा दर्पण वृत्तपत्राचा उद्देश होता. या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे या वृत्तपत्रात सुरुवातीस इंग्रजी व मराठी भाषेमध्ये मजकूर असायचा. जांभेकर यांनी शिक्षण व मनोरंजन असा समन्वय साधला होता, तसेच त्यांनी दिग्दर्शन नावाचे पहिले मासिकही सुरु केले होते. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी केली जाते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: