मंदार आपटे
रत्नागिरी : कॅनरा बँकेच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित कर्ज मेळाव्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
मेळाव्याचे उद्घाटन बँकेचे एजीएम श्रीशरण मोगर यांनी दीपप्रज्वलन करून केले. मांडवी येथील हॉटेल सी फॅन्स येथे हा कर्ज मेळावा झाला.
या मेळाव्यामध्ये गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनेतारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, तारण कर्ज अशा विविध प्रकारच्या कर्जांची माहिती देण्यात आली. तसेच कागदपत्र पूर्तता करून कर्ज वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून क्रेडाइचे नित्यानंद भुते, एजीएम श्रीशरण मोगर, डीएम श्री. फुले, कोस्टगार्डचे कमांडन्ट जी. श्रीनिवास आदी उपस्थित होते. नित्यानंद भुते यांनी सांगितले की, बँकेने बांधकाम व्यवसायिक व मच्छी व्यवसायिक यांच्यसाठी गृह प्रदर्शन भरवावे. जेणेकरून दोघांनाही फायदा होईल व ग्राहकांना त्वरित व कमी व्याज दराने कर्जपुरवठा होईल. बँकेने गृह कर्जसाठी वेगळा विभाग करावा. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील व्यवसायिक, कर्जदार, ठेवीदार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेतली. अधिक माहिती व कर्ज वितरणासाठी श्री तृणाल येरूणकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
शाखा व्यवस्थापक निशीत गायकवाड सूत्रसंचालन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: