मंदार आपटे
खेड : न्यू इंग्लिश स्कूल खवटी आणि पी के दरेकर ज्युनिअर कॉलेज यांचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
येथील प्रशालेला नेहमीच देणगी स्वरुपात योगदान देणारे आपल्या खवटी पंचक्रोशीतील सुपुत्र, महाबळेश्वर येथील उद्योजक मन्सूर हमीद जोगीलकर यांचा संपूर्ण पंचक्रोशीच्यावतीने शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. खवटी प्रशालेच्या विज्ञान प्रयोगशाळेच्या साहित्यासाठी त्यांनी एक लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले असून स्नेहसंमेलनासाठी त्यांनी रोख ११ हजार रुपये बक्षिस म्हणून संस्थेला दिले.
तसेच 1988 च्या बॅचचे टीम प्रमुख उद्योजक हेमंत दरेकर यांनी त्यांच्या संपूर्ण बॅचच्या वतीने रोख रक्कम रुपये 25 हजार संस्थेला बक्षिस म्हणून दिले.
तसेच नेरोलॅक कंपनी लोटे यांनी संपूर्ण खोल्यांना रंगरंगोटी करण्यासाठी रंगाचे साहित्य उपलब्ध करुन संस्थेला मदत केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र ऊर्फ राजा बेलोसे यांनी सर्व मदत करणार्यांना धन्यवाद देऊन आभार मानले .
यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळ कार्यक्रमाला उपस्थित होते.
न्यू इंग्लिश स्कूल खवटीचे मुख्याध्यापक पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Very nice 👍👍
उत्तर द्याहटवा