खेड : येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव ( उच्च माध्यमिक विभाग ) या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी एस ओ एफ मार्फत घेतल्या जाणाऱ्या नॅशनल सायन्स ऑलंपियाड (NSO) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.
इ. 7 वी तील अनुराग महादेव वाघमोडे शालेयस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक प्राप्त व मुख्य परीक्षेकरिता पात्र, हर्ष विनायक थळकर शालेयस्तर द्वितीय क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त. दिशा दिलीप मोहिते शालेयस्तर तृतीय क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त, इ. 8 वी तील अमृता चंद्रकांत शेलार शालेयस्तर प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त व मुख्य परीक्षेकरिता पात्र, प्रथमेश अमोल भिडे शालेयस्तर द्वितीय क्रमांक म व सुवर्ण पदक प्राप्त, श्रावस्ती प्रभाकर कांबळे शालेयस्तर तृतीय क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त तर इ. 9 वी तील राधिका अमित रांगडे शालेयस्तर प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त, गौरी गोपीनाथ पवार शालेयस्तर द्वितीय क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त, तसेच इ. 12 वी विज्ञान मधील मिनार नरेश गुजरने आंतरराष्ट्रीय स्तरावर 66 वा क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त तसेच मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरला आहे. शालेय स्तरावर शुभम सुधाकर दळवी, सानिका प्रशांत चव्हाण, आदित्य सुहास भोसले, आर्यन प्रकाश ओकटे, शर्वरी प्रकाश गोरीवले, आदित्य सचिन हेरवाडे, समर्थ राजेंद्र मोरे , तन्मय प्रकाश लटके, आदित्य दिलीप मोरे, नम्रता अविनाश देवळेकर व अथर्व विकास म्हादलेकर या विद्यार्थ्यांनाही सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.
सदर विद्यार्थ्यांना विज्ञान विभाग प्रमुख विठ्ठल सकुंडे, मकरंद दाबके, सतीश माने, पंकज हालके, कांतिनाथ शिंदे, अभिजित शेळके, अश्विनी पाटील, साधना थोरात, विनोद टेंबे, रागिणी जामकर, संदेश जाधव या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, संस्थेचे उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराथी, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा व सर्व विश्वस्त व सभासद, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

Congratulations!!
उत्तर द्याहटवा