मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा "गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा" निकाल जाहीर

 


घरगुती गणेशोत्सव सजावट गटांत कोल्हापूरचे दीपक हजारे यांना प्रथम पारितोषिक

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या गटात रत्नागिरीच्या पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथम पारितोषिक

मुंबई  : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ३१ ऑगस्ट  २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा - सजावट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा निकाल आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी जाहीर केला आहे.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून एकूण ४७९ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांपैकी घरगुती गणेशोत्सव सजावट गटांत ३७९, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ १०० या गटात  स्पर्धक सहभागी झाले. घरगुती गणेशोत्सव सजावट गटांत दीपक हजारे (कोल्हापूर) यांना प्रथम पारितोषिक, राजेश परदेशी (अहमदनगर) यांना द्वितीय पारितोषिक, कोमल अग्रवाल (औरंगाबाद) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या गटात पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रत्नागिरी) या मंडळाला प्रथम पारितोषिक, शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळ (नाशिक) या मंडळाला द्वितीय पारितोषिक, तर श्री आवडता गणेश मंडळ (नांदेड) या मंडळाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.  

तसेच, घरगुती गणेशोत्सव सजावट आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या दोन्ही स्पर्धांना मिळून एकूण वीस उत्तेजनार्थ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : 

१.  घरगुती गणेशोत्सव सजावट गट: १. प्रिती पवार (नाशिक), २. प्राची पाटील (कोल्हापूर), ३. अदिरा इंगळे (पुणे), ४. नितीन पाटील (नाशिक), ५. ललिता कोठावदे (नाशिक), ६. स्वप्निल मुळे (पुणे),७. पराग अत्तरदे (जळगाव), ८. रमेश सूर्यवंशी (लातूर),  ९. सुनिल करंबेळे (रत्नागिरी) आणि १०. स्नेहल खराळकर (पुणे). 

२. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गट : १.  प. पू गगनगिरी महाविद्यालय सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ (अहमदनगर), २. हाय कमांडो फ्रेंड्स सर्कल मंडळ (कोल्हापूर) ३. राजे शिवाजी विद्यालय गणेश मंडळ (नंदुरबार), ४. गणराज तरुण मंडळ (अहमदनगर) ५. विजय बाल उत्सव गणेश मंडळ (नागपूर), ६. श्री अष्टविनायक मित्र मंडळ (पुणे), ७. भारत क्रिडा मंडळ (नागपूर), ८. शंकरपुरा पेठ सांस्कृतिक विकास मंडळ (पुणे)  ९. सुवर्णयुग तरुण मंडळ (अहमदनगर) आणि १०. श्री.कृष्ण गणेश मित्र मंडळ  (अहमदनगर)

घरगुती गणेशोत्सव सजावट गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे  ११ हजार रुपये, ७ हजार रुपये आणि ५ हजार रुपये ; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त दहा विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे  ५१ हजार रुपये, २१ हजार रुपये आणि ११ हजार रुपये; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त दहा विजेत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. 

या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम चित्रपट अभ्यासक संतोष पाठारे आणि कलावंत विकी शिंदे यांनी पाहिले आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी दिली.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा "गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा" निकाल जाहीर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा "गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा" निकाल जाहीर Reviewed by ANN news network on १२/२०/२०२२ ०६:०३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".