आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊ आणि या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक भिडे वाडा येथे करण्याबाबत राज्य शासन गंभीर आहे. लवकरच त्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासंदर्भात तात्काळ बैठक घेऊ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Reviewed by ANN news network
on
१२/२०/२०२२ ०५:४१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: