महत्त्वाची वैशिष्ट्ये:
· अॅक्सिस बँकेने निवृत्ती आणि पेन्शन व्यवासायात पर्दापण केले असून त्यानिमित्ताने अॅक्सिस असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड या उपकंपनीद्वारे अॅक्सिस पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेड ही नवी उपकंपनी सुरू करण्यात आली आहे.
· यामुळे समूहाद्वारे आता नागरिकांना निवृत्तीशी संबंधित विविध प्रकारची खास उत्पादने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
· अॅक्सिस पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेडची पेर्डासह (पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी) एनपीएस आर्किटेक्चर अंतर्गत स्थापना करण्यात आली आहे.
· २० सप्टेंबर २०२२ रोजी व्यवसाय सुरू करण्यासाठीचे प्रमाणपत्र मिळाले असून २१ ऑक्टोबर २०२२ रोजी कामकाजाची सुरुवात करण्यात आली.
· अॅक्सिस पेन्शन फंडाने व्यवसायाच्या पहिल्या ४५ दिवसांत १०० कोटी रुपये एयूएमचा टप्पा पार केला आहे.
मुंबई : अॅक्सिस पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेडची (अॅक्सिस पीएफएम) पेर्डाने (पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी) नॅशनल पेन्शन सिस्टीमअंतर्गत फंडाचे व्यवस्थापन करण्यासाठी पेन्शन फंड मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे. अॅक्सिस पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेड/ अॅक्सिस पीएफएम ही अॅक्सिस पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेडची उपकंपनी आणि अॅक्सिस बँक लिमिटेडच्या उपकंपनीची उपकंपनी आहे. पेर्डाकडून अॅक्सिस पीएफएमला २० सप्टेंबर २०२२ रोजी व्यवसाय सुरू करण्यासाठीचे प्रमाणपत्र मिळाले असून २१ ऑक्टोबर २०२२ पासून कामकाजाची सुरुवात करण्यात आली.
नव्याने लाँच करण्यात आलेल्या कंपनीमुळे आता अॅक्सिस समूहाला नागरिकांना निवृत्तीशी संबंधित सर्व प्रकारची उत्पादने उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. अॅक्सिस पीएफएम प्रामुख्याने विविध क्षेत्रातील नागरिक- गुंतवणुकदारांच्या उदा. कॉर्पोरेट क्षेत्र, सरकारी क्षेत्रातील कार्यरत नागरिकाच्या निवृत्तीवेतन निधीचे व्यवस्थापन करेल. हे व्यवस्थापन नियामक मंडळाने घालून दिलेल्या गुंतवणुकविषयक मार्गदर्शन तत्वांशी सुसंगत असेल. कंपनीने सर्व नागरिकांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी एनपीएससह निधी उभारून देण्याचे व पर्यायाने निवृत्तीनंतर नियमित वेतनाचा आनंद मिळवून देण्याचे ध्येय ठेवले आहे. कंपनी पेर्डाच्या मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत राहात गुंतवणुकदारांना दीर्घकालीन, सातत्यपूर्ण आणि जोखीम हाताळत जास्तीत जास्त परतावे मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.
अॅक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी म्हणाले, ‘अॅक्सिस पेन्शन फंडाच्या लाँचसह आम्ही निवृत्तीविषयक उत्पादन क्षेत्रातील आमचे अस्तित्व बळकट करत आहोत. अॅक्सिस समूहाची वितरण व्यवस्था तसेच गुंतवणूक व्यवस्थापन क्षमता यांच्या जोरावर अॅक्सिस पेन्शन फंड लवकरच या क्षेत्रातील सर्वाधिक पसंतीची निवृत्ती उत्पादन पुरवठादार ठरेल असा विश्वास वाटतो. व्यवसायाची सुरुवात केल्यापासून पहिल्या ४५ दिवसांतच १०० कोटी रुपयांच्या एयूएमचा टप्पा पार करणारी ती सर्वात वेगवान खासगी पेन्शन फंड कंपनी ठरली आहे.’
अॅक्सिस पेन्शन फंडाकडे
नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार निवृत्ती आणि पेन्शनशी संबंधित योग्य उत्पादने
पुरवण्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ कार्यरत आहे. ग्राहक व गुंतवणुकदारांना त्यांची
स्वप्ने तसेच महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे मनुष्यबळ बांधील असून त्यासाठी
नियामक मंडळाने घालून दिलेल्या चौकटीत राहून सर्व प्रकारच्या अॅसेट्समध्ये
दर्जेदार गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
या लाँचविषयी अॅक्सिस पेन्शन फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित शुक्ला म्हणाले, ‘ग्राहक मानसिकतेची अचूक माहिती, सक्षम कर्मचारी आणि तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर यांच्या मदतीने ग्राहक सेवा वितरण क्षेत्रातील सर्वाधिक पसंतीची निवृत्तीविषयक उत्पादन पुरवठादार कंपनी होण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन अजूनही भारतात प्राथमिक अवस्थेत आहे. भारतातील सर्व नागरिकांनी एनपीएससह निवृत्तीनंतरच्या काळासाठी निधी उभारावा आणि अॅन्युईटी पोस्ट सुपरअॅन्युएशनच्या माध्यमातून नियमित उत्पन्नाचा आनंद घेत निवृत्तीनंतरचे आयुष्य अधिक सुरक्षितपणे जगावे अशी आम्ची इच्छा आहे. निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन करून नागरिकांना मुक्तपणे आणि आर्थिक स्वातंत्र्यासह जगता येईल.’
या नव्या घडामोडीमुळे अॅक्सिस
समूह आता निवृत्तीशी संबंधित सर्व उत्पादन विभागांना सेवा देणार असून त्यात पेन्शन
उत्पादने, पेन्शन फंड व्यवस्थापन आणि अॅन्युईटीजचा
समावेश आहे. या उत्पादन श्रेणीच्या मदतीने नागरिकांना निवृत्तीनंतरचे आयुष्य
सहजपणे जगण्यासाठी मदत केली जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: