ओरिएंटल यीस्ट इंडियातर्फे पुण्यात अत्याधुनिक यीस्ट उत्पादन केंद्र उभारण्यासाठी ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक

 




नवीन सुविधा केंद्रात पहिल्या टप्प्यात ३३,००० दशलक्ष टनांसह होणार कामाला सुरूवात

~प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारामध्ये १००० हून अधिक नोकरीच्या संधी निर्माण होणार

 

पुणे : यीस्ट उत्पादनात जपानमधील जागतिक आघाडीवर असलेल्या ओवायसी जपान कंपनीची उपकंपनी ओरिएंटल यीस्ट इंडिया (ओवायआय) ने सातारा येथील खंडाळा एमआयडीसीमध्ये जागतिक स्तरावरचा यीस्ट प्रकल्प निर्माण करण्यासाठी ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून आपला ठसा विस्तारला आहे. या अत्याधुनिक उत्पादन सुविधा केंद्रात त्याच्या कामकाजाच्या पहिल्या टप्प्यात ३३,००० दशलक्ष टन ताजे यीस्ट तयार करण्याची क्षमता आहे. या उत्पादन केंद्रामुळे या प्रदेशातील रोजगार वाढेलया प्रकल्पात थेट २०० जणांना रोजगार मिळेल आणि यापुढे मूल्य साखळीतून स्थानिक पुरवठादारांद्वारे ८०० जणांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल.



शाश्वतता हा मुख्य मूल्य स्तंभांपैकी एक म्हणून असलेली एक जबाबदार संस्था या नात्याने या अत्याधुनिक उत्पादन सुविधा केंद्राची उभारणी उच्च अन्न सुरक्षा जागतिक मानकांनुसार तयार करण्यात आली आहेझिरो लिक्विड डिस्चार्ज जल प्रक्रिया सुविधेने भारतीय उद्योगासाठी मापदंड बनवला आहे. ओरिएंटल यीस्ट इंडिया ही भारतातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बेकरीडिस्टिलरीज आणि इतर खाद्य विभागांना यीस्ट उत्पादने पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.



ओवायसी जपानचे अध्यक्ष आणि ओरिएंटल यीस्ट इंडियाचे अध्यक्ष मासाशी नाकागावा म्हणाले, "भारत हा आमच्या जागतिक रणनीतीचा आधारस्तंभ आहे आणि ओवायसी दृष्टीकोनातून निश्चितपणे सर्वोच्च लक्षकेंद्रित बाजारपेठांपैकी एक आहे. हा नवीन प्रकल्प भारताप्रती आमच्या वचनबद्धतेची साक्ष देतो आणि आमच्या आंतरराष्ट्रीय विस्तारासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मोठ्या खाद्यपदार्थ साखळीस्थानिक बेकर्स आणि इतर संबंधित उद्योगांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प नाविन्यपूर्ण यीस्ट उत्पादने आणि सेवा पुरवेल. 'मेक इन इंडियाउपक्रमाशी सुसंगत असल्यामुळे हा प्रकल्प भारतातील यीस्ट आयात करण्यावरील अवलंबित्व कमी करेल. आमच्या सामायिक विकासाच्या यशासाठी आम्ही आमच्या सर्व ग्राहक आणि भागधारकांसोबत सहकार्य करण्यास उत्सुक आहोत."



ओवायसी ची स्थापना १९२९ मध्ये जपानची पहिली बेकर्स यीस्ट उत्पादक म्हणून करण्यात आली होती आणि तेव्हापासून विविध खाद्य उत्पादनेबेकरी उत्पादन घटक आणि इतर जैवतंत्रज्ञान-संबंधित उत्पादने पुरवत त्यांचा विस्तार झाला आहे. गेल्या काही वर्षांत ओवायसी ही जपानमधील सर्वात मोठी यीस्ट उत्पादक कंपनी बनली आहे. उच्च दर्जाच्या यीस्ट फरमेंटेशन तंत्रज्ञानाच्या विकासाद्वारे ओवायसीने उच्च-गुणवत्तेच्या जैवरासायनिक संशोधनात योगदान दिले आहे तसेच नाविन्यपूर्ण यीस्ट आणि बेकरी घटक उत्पादने तयार केली आहेत.

ओरिएंटल यीस्ट इंडियातर्फे पुण्यात अत्याधुनिक यीस्ट उत्पादन केंद्र उभारण्यासाठी ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक ओरिएंटल यीस्ट इंडियातर्फे पुण्यात अत्याधुनिक यीस्ट उत्पादन केंद्र उभारण्यासाठी  ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक Reviewed by ANN news network on १२/२०/२०२२ ०५:३१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".