पुणे : सुट्ट्यांच्या या सीझनमध्ये उठावदार रंगांशी दोस्ती करा आणि विविध रंगछटा व आकारांसह तुमचा आनंद साजरा करा. भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा समूहातील एक सदस्य तनिष्कने अतिशय अनोखे कॉकटेल कलेक्शन सादर करत असल्याची घोषणा केली आहे - 'कलर मी जॉय - द कार्निवल एडिट'. मनामध्ये आशा आणि आनंद निर्माण करणारे हे ज्वेलरी कलेक्शन मौल्यवान रंगीबेरंगी खड्यांच्या रूपाने साकार करण्यात आलेल्या रंगांच्या सिम्फनीने प्रेरित होऊन तयार करण्यात आले आहे.
हे कलेक्शन मनामध्ये उत्साह जागवते, आत्मिक मुक्ती वाढवण्यासाठी हे डिझाईन करण्यात आले आहे. कलर मी जॉयची अजून एक प्रेरणा आहे कार्निवल आणि त्यांचे रंगीबेरंगी वैभव. कार्निवल राइड्स, त्यातील चमचमते ग्लॅमर, रंगीबेरंगी बॉबल्स आणि कार्निवलमधील मिरवणुका इत्यादींनी प्रेरित होऊन या दागिन्यांची रचना करण्यात आली आहे. हिरे आणि ऍक्वामरीन, ऍमेथिस्ट, एमराल्ड, पिंक ओपल व ब्ल्यू टोपाझ यासारख्या रंगीत जेमस्टोन्सचा अनोखा मिलाप साधून यामध्ये ग्लॅमर व लालित्य निर्माण करण्यात आले आहे. कार्निवलमधील उत्साह आणि आनंद यामध्ये ठायीठायी जाणवतो.
टायटन कंपनी लिमिटेडच्या चीफ डिझाईन ऑफिसर श्रीमती रेवती कांत यांनी या अप्रतिम कलेक्शनच्या लॉन्च प्रसंगी बोलताना सांगितले की, “तनिष्कने नेहमीच संस्कृती, शैली आणि कालखंडाच्या पलीकडे जाऊन अनोखे, अद्वितीय दागिने प्रस्तुत करून महिलांचा आनंद साजरा केला आहे. आज आपण आत्म-अभिव्यक्तीच्या नवीन युगात प्रवेश करत असताना, तनिष्क डिझाइन्स समकालीन सिल्हटसह भावनिक अर्थ अधोरेखित करतात. आमचे कलर मी जॉय- कार्निव्हल एडिट कलेक्शन हे आजच्या स्त्रीसाठी एक संदेश आहे जी असे मानते की जीवन एखाद्या कार्निव्हलपेक्षा कमी नाही आणि स्वत:चा खरा आदर्श निर्माण करण्यावर विश्वास ठेवते. या कलेक्शनमध्ये बारकाव्यांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे, तेजस्वी, फॅन्सी-कट हिरे आणि चमकदार सेमी-प्रेशियस रंगीत जेमस्टोन्स महिलेचे प्रभावी व्यक्तिमत्व साजरे करतात. हे कलेक्शन परिधान करणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व खुलवतात. आम्हाला आशा आहे की यंदाच्या सीझनमध्ये रंगांचे प्रकार आणि सिम्फनीचा आनंद तुम्हाला आत्मिक शांती मिळवून देईल."
कलर मी जॉय हा तनिष्कमधील शानदार व कलात्मकतेने घडवण्यात आलेल्या डिझाइन्सचा उत्सव आहे.
या विशेष कॉकटेल कलेक्शनच्या किमती १ लाख रुपयांपासून पुढे असून निवडक तनिष्क स्टोर्समध्ये व तनिष्कच्या https://www.tanishq.co.in/
तनिष्क:
तनिष्क हा टाटा समूहातील ब्रँड भारतातील ग्राहकांचा सर्वाधिक पसंतीचा ब्रँड आहे. गेल्या दोन दशकांपासून हा ब्रँड उत्तमोत्तम कारिगरी, खास प्रेरणा व संकल्पना घेऊन बनवण्यात आलेली डिझाइन्स, उत्पादनांच्या गुणवत्तेची हमी यांचे प्रतीक मानला जात आहे. भारतीय महिलांची आवड, त्यांची स्वप्ने, इच्छा समजून घेऊन, परंपरा व आधुनिकता या दोन्हींशी संबंधित गरजा व इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने प्रयत्नशील असलेला एकमेव ज्वेलरी ब्रँड हा मान तनिष्कला मिळाला आहे. २०१९मध्ये ट्रस्ट रिसर्च अड्वायजरीने भारतातील सर्वाधिक विश्वसनीय ज्वेलरी ब्रँड हा खिताब तनिष्कला बहाल केला. शुद्धतम दागिने देण्याच्या वचनबद्धतेला अनुसरून तनिष्कच्या सर्व दुकानांमध्ये कॅरेटमीटर ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सोन्याची शुद्धता सर्वात कार्यक्षम पद्धतीने तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तनिष्कच्या रिटेल शृंखलेमध्ये सध्या २२० पेक्षा जास्त शहरांमध्ये ३८५ एक्सक्लुसिव्ह स्टोर्सचा समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: