रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या शुक्रवार १६ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वा. मुंबई येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण करणार आहेत. सकाळी ११.०० वाजता रत्नागिरी विमानतळ आगमन होणार आहे. ११.३० वाजता मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करणार आहेत. ११.४५ वा. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवा मंदिर येथे दर्शन घेणार आहेत.
दुपारी १२.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालयात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत आढावा बैठक होणार आहे. दुपारी १.३० ते २.४५ वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव असणार आहेत २.४५ ते ३.३० पर्यत शासकीय विश्रामगृह येथे भाजपा पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा, रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशन, एस. टी. महामंडळ कर्मचारी संघटना शिक्षक संघटना, मच्छीमार संघटना, आंबा बागायतदार संघटना, जिल्हा परिषद, महसूल अधिकारी/कर्मचारी संघटना अशा विविध संघटनांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार आहेत.
दुपारी ३.४५ वा. थिबा पॅलेस रोड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी येथे भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सायं. ४.०० वा. माळनाका येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. सायं. ५.०० वा. स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे रु. ७०० कोटींच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन करतील आणि जाहीर सभेत बोलतील. त्यानंतर सायं. ७ वाजता रत्नागिरी येथून मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण करणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: