हिंजवडी : आय.आय.ई.बी.एम आणि फिटीस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने जवानांच्या सन्मानार्थ विजय दिनानिमित्ताने सोल्जरॅथॉन- विजयरन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या रन मध्ये ५ किमी व १० किमी धावणे स्पर्धक सहभागी होणार आहेत..
१९७१ रोजी पाकिस्तानवर भारतीय सेनेने ऐतिसाहिक विजय मिळवल्याने प्रत्येक वर्षी १६ डिसेंबरला विजय दिवस' साजरा केला जातो. तर १९७१ च्या युद्धात बांग्लादेशाच्या मुक्तीसाठी भारतीय सेनेकडून पाकिस्तानवर विजय मिळवल्याच्या कारणास्तव हा दिवस साजरा केला जातो.
या निम्मिताने फिटीस्थान व आय.आय.ई.बी.एम. यांच्या संयुक्त विद्यामाने दि. १८/१२/२०२२ रोजी सकाळी ६.०० वाजता आय.आय.ई.बी.एम.इंडस बिझनेस स्कूल, वाकड येथे “विजय दिवस “ च्या निमित्ताने सोल्जरॅथॉन- विजयरन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून १५० विद्यार्थी या स्पर्धे मध्ये सहभागी होणार आहेत,
स्पर्धेचे उदघाटन म्हणुन हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ विवेक मुगळीकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून होणार आहे,अशी माहिती आयोजक डॉ. जयसिंग मारवाह व्यवस्थापकीय संचालक, आय.आय.ई.बी.एम.यांनी दिली दरम्यान, विजय दिवसानिमित्त पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांची आठवण म्हणून त्यांना श्रद्धांजली दिली जाणार आहे.तसेच भारतीय सेनेतील या वीर जवानांची वीरगाथा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरित करणारी ठरणार आहे. तंदुरुस्त भारत आणि जवानांच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: