पुण्यात पर्वती जनता वसाहतीत गुन्हे शाखा युनिट-२ चा मोठा छापा; १२ धारदार लोखंडी शस्त्रांसह सराईत गुन्हेगार गौरव कांबळे अन् ३ अल्पवयीन ताब्यात



पुणे (६ ऑगस्ट २०२६): पुणे शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेकडून सातत्याने धडक कारवाया राबवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर, गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनता वसाहत परिसरात छापा टाकून एका १८ वर्षीय सराईत आरोपीसह त्याच्या ३ अल्पवयीन (विधीसंघर्षित) साथीदारांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकूण १२ घातक व धारदार लोखंडी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

जनता वसाहत, पर्वती येथील राम मंदिराच्या पाठीमागे, गल्ली नंबर ७७ येथे गौरव कांबळे नावाचा तरुण आणि त्याचे तीन मित्र बेकायदेशीरपणे घातक व धारदार लोखंडी शस्त्रे घेऊन थांबले आहेत, अशी पक्की माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-२  च्या कर्मचारयांनी  जनता वसाहतीतील गल्ली नंबर ७७ मध्ये जाऊन वेढा घातला. तेथे संशयितरीत्या थांबलेल्या मुख्य आरोपी गौरव राजू कांबळे (वय १८ वर्षे, रा. गल्ली नंबर ७७, जनता वसाहत, पर्वती, पुणे)सह त्याच्या तिन्ही अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले

पोलिसांनी त्यांची अंगझडती आणि परिसराची झाडाझडती घेतली असता, त्यांच्या ताब्यामध्ये सुमारे ८,५००/- रुपये किमतीची एकूण १२ धारदार लोखंडी शस्त्रे आढळून आली. पोलिसांनी हा सर्व शस्त्रसाठा जागीच जप्त केला आहे.

पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी पर्वती पोलीस ठाणे, पुणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २५३/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा (Arm Act) कलम ४ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (२) (३) सह १३५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील कायदेशीर तपासासाठी आरोपींना पर्वती पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

या मोहिमेत गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी वरिष्ठ  निरीक्षक राहुल खिलारे, महिला  उपनिरीक्षक तेजश्री, उज्ज्वल मोकाशी, संदिप शिके, विजयकुमार पवार, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, नागनाथ राख, शंकर नेवसे, आशिष यादव, शंकर कुंभार, विजय पवार, योगेश मांढरे आणि विनायक वगारे या पथकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले.


  • Labels: Pune Police, Crime Branch Unit 2, Parvati Police Station, Weapons Seized, Janata Vasahat, Pune Crime News, Arms Act

  • Search Description: Pune Police Crime Branch Unit-2 seized 12 sharp iron weapons from a habitual criminal and 3 juveniles in Janata Vasahat, Parvati.

#PunePolice #CrimeBranch #PuneCrimeNews #Parvati #JanataVasahat #WeaponsSeized #ArmsAct #BreakingNews #MaharashtraNews

 

पुण्यात पर्वती जनता वसाहतीत गुन्हे शाखा युनिट-२ चा मोठा छापा; १२ धारदार लोखंडी शस्त्रांसह सराईत गुन्हेगार गौरव कांबळे अन् ३ अल्पवयीन ताब्यात पुण्यात पर्वती जनता वसाहतीत गुन्हे शाखा युनिट-२ चा मोठा छापा; १२ धारदार लोखंडी शस्त्रांसह सराईत गुन्हेगार गौरव कांबळे अन् ३ अल्पवयीन ताब्यात Reviewed by ANN news network on ८/०६/२०२६ ०९:३३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".