मुंबई विमानतळ परिसरात लेझर लाईट, पतंग व फुगे उडवण्यावर ६० दिवस बंदी





मुंबई | २७ जुलै २०२६ :  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम आणि नौदल हवाई स्टेशन 'आयएनएस शिका' च्या परिसरातील मुक्त उड्डाण क्षेत्रात (Free Flight Zone) विमानांच्या सुरक्षित लँडिंग व टेक-ऑफसाठी मुंबई पोलिसांनी ६० दिवसांची बंदी लागू केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत पोलीस उप आयुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी हे आदेश दिले आहेत. हा आदेश १ ऑगस्ट २०२६ ते २९ सप्टेंबर २०२६ पर्यंत अंमलात राहील.

विमानतळाच्या परिसरात उंच उडणारे फटाके (हाय रायझर फटाके), प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तू, फुगे, पतंग उडवणे, पॅराग्लायडिंग करणे आणि विमानांच्या दिशेने लेझर लाईट बीम मारणे यामुळे विमानांच्या सुरक्षित आवागमनाला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अपघात घडण्याची शक्यता असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून ही कडक पावले उचलण्यात आली आहेत.

या आदेशानुसार विमानतळ परिसरातील फ्री लाईट झोनमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही वस्तू उडवण्यास पूर्णपणे मनाई असेल. असा प्रकार कोणाच्या निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत दंडात्मक कारवाईस पात्र राहील.


  •  Labels: Mumbai Airport, Security Order, Mumbai Police, BNSS Section 163, Aviation Safety

  • Search Description: Mumbai Police ban laser lights, balloons, kites, and high-riser crackers near Chhatrapati Shivaji Maharaj International Airport for 60 days.

  • Hashtags: #MumbaiAirport #AviationSafety #MumbaiPolice #SafetyAlert #Mumbai


मुंबई विमानतळ परिसरात लेझर लाईट, पतंग व फुगे उडवण्यावर ६० दिवस बंदी मुंबई विमानतळ परिसरात लेझर लाईट, पतंग व फुगे उडवण्यावर ६० दिवस बंदी Reviewed by ANN news network on ७/२८/२०२६ ११:४७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".