पुणे : समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत सराईत आरोपींकडून सुमारे १५ लाख रुपये किमतीचे १० तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. या कारवाईत शाकीर जाकीर तेली (वय २९, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) याच्यासह त्याचे साथीदार मोसीन खान नूर खान (वय ३१, रा. एमएनपी कर्मचारी क्वार्टर्स, गेदालाल मिल, जळगाव) आणि इस्माईल ऊर्फ राजू शब्बीर शेख (वय ५०, रा. एकता हॉलच्या मागे, जळगाव) यांना अटक करण्यात आली.
समर्थ पोलीस ठाण्यात गु.र.नं. १७५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील महिला ज्येष्ठ नागरिक १४ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० ते ११.४० वाजण्याच्या सुमारास पॉवर हाऊस चौक ते भवानी पेठ, पुणे असा ऑटोरिक्षातून प्रवास करीत असताना चार अनोळखी इसमांनी संगनमत करून त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरल्याची तक्रार दिली होती.
तपासादरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी जळगावचा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तपास पथकाने आरोपींचा शोध घेऊन शाकीर जाकीर तेली याला १ जुलै २०२६ रोजी रात्री १०.०५ वाजता अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात इतर साथीदारांची माहिती मिळाल्यानंतर मोसीन खान नूर खान आणि इस्माईल ऊर्फ राजू शब्बीर शेख यांना २ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८.२५ वाजता मालधक्का चौक, पुणे येथे ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
अटक आरोपींकडे सखोल तपास केल्यानंतर त्यांनी पुणे शहर हद्दीतील सिंहगड रोड, काळेपडळ, वानवडी, बंडगार्डन तसेच पिंपरी-चिंचवड भागात अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे फाईलमध्ये नमूद आहे. चोरीच्या मालाबाबत तपास करून त्यांच्याकडून सुमारे १५ लाख रुपये किमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अंमलदार शेख करीत आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर राजेश बनसोडे, उपआयुक्त, परिमंडळ-१ कृष्णीकेश रावले आणि सहायक आयुक्त, फरासखाना विभाग सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयंत राजुकर, निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक संदीप पाटील तसेच अंमलदार पगार, रोहिदास वाघ, इम्रान शेख, औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, अविनाश दरवडे, चौधरी, यादव आणि महिला अंमलदार गंगावणे यांनी केली.
Labels: Pune Crime, Samarth Police Station, Gold Chain Theft, Gold Jewellery Theft, Senior Citizen Crime, Pune Police, Theft Case, Gold Theft, Pune Crime News, Maharashtra Crime
Search Description: Samarth Police arrested three accused in a gold chain theft case involving a senior citizen and recovered 10 tolas of gold jewellery worth approximately Rs. 15 lakh in Pune.
Hashtags: #PuneCrime #SamarthPolice #GoldTheft #GoldChainTheft #PunePolice #SeniorCitizenCrime #PuneNews #CrimeNews #MaharashtraCrime
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: