मुंबई पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावले

 


मुंबई | २७ जुलै २०२६ :  बृहन्मुंबईत सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्रात शस्त्रे, स्फोटके आणि संक्षारक पदार्थ बाळगण्यावर तसेत चिथावणीखोर कृत्ये करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी अकबर पठाण यांनी हे आदेश जारी केले आहेत. हा आदेश २९ जुलै २०२६ च्या मध्यरात्री ००.०१ वाजेपासून ते २७ ऑगस्ट २०२६ च्या २४.०० वाजेपर्यंत लागू राहील.

या आदेशानुसार बृहन्मुंबईमध्ये शस्त्रे, बंदुका, तलवारी, भाले, दंडूके, चाकू, काठ्या किंवा शारीरिक हानी पोहोचवू शकेल असे कोणतेही हत्यार बाळगण्यास मनाई आहे. तसेच स्फोटक किंवा संक्षारक पदार्थ वाहून नेणे, दगड गोळा करणे किंवा फेकण्याची साधने तयार करणे, पुतळ्यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह गाणी, संगीत किंवा भाषणे देणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

शालीनता व सामाजिक नैतिकतेला बाधा आणणारी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात आणणारी चित्रे, फलक किंवा चिन्हे प्रदर्शित करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस अधिकाऱ्यांमार्फत शस्त्रे जप्त करण्याची व कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

हे निर्बंध शासकीय सेवेतील कर्मचारी, पोलीस अधिकारी, तसेच सुरक्षा रक्षक किंवा चौकीदार (ज्यांच्याकडे साडेतीन फुटांपर्यंतच्या काठ्या आहेत) यांना त्यांच्या कर्तव्याच्या भाग म्हणून लागू असणार नाहीत.


  • Labels: Mumbai Police, Prohibitory Orders, Law and Order, Mumbai News, Akbar Pathan

  • Search Description: Mumbai Police issued prohibitory orders under Maharashtra Police Act banning arms, explosives and inflammatory displays from July 29 to August 27, 2026.

  • Hashtags: #MumbaiPolice #ProhibitoryOrder #SafetyFirst #LawAndOrder #MumbaiNews


मुंबई पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावले मुंबई पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावले Reviewed by ANN news network on ७/२८/२०२६ ११:३९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".