अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या १२५ व्या वर्षपूर्ती सोहळ्यात गौरव
नृत्यांगना सोनल मानसिंह यांच्या हस्ते नवी मुंबईत सन्मान प्रदान
बलवल्ली यांनी 'रागोपनीषद' ग्रंथातून मांडले भारतीय रागदारीचे तत्त्वज्ञान
नवी मुंबई, (प्रतिनिधी): भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेचे जतन करणाऱ्या 'अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय' या संस्थेच्या १२५ व्या वर्धापन दिनानिमित्त संगीत क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान 'संगीत महामहोपाध्याय' डॉ. भरत बलवल्ली यांना प्रदान करण्यात आला. १८ ऑगस्ट रोजी नवी मुंबईतील तेरना सभागृहात झालेल्या या सोहळ्यात प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना पद्मविभूषण विदुषी सोनल मानसिंह यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.
डॉ. भरत बलवल्ली यांनी त्यांच्या 'रागोपनीषद' या ग्रंथातून भारतीय रागदारी संगीतातील उपनिषदात्मक तत्त्वज्ञान जगासमोर मांडले आहे. त्यांनी संगीताला केवळ कला म्हणून न पाहता, आत्मशोधाचा मार्ग म्हणून स्वीकारले आहे. आपल्या गायकीतून त्यांनी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचे सामर्थ्य जागतिक पातळीवर पोहोचवले आहे.
याच सोहळ्यात देशभरातून आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना 'संगीत विशारद' आणि 'संगीत अलंकार' या पदव्याही प्रदान करण्यात आल्या. हा सोहळा गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य पं. विष्णु दिगंबर पलुसकर यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता.
Sangeet MahamahopadhyayDr. Bharat Balavalli
All India Gandharva Mahavidyalaya
Indian Classical Music
Sonal Mansingh
#SangeetMahamahopadhyay #BharatBalavalli #GandharvaMahavidyalaya #IndianClassicalMusic #SonalMansingh

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: