अभिनेता अक्षयकुमार आणि अर्शद वारसी यांना पुणे न्यायालयाचा दणका

 


‘जॉली एलएलबी ३’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; कोर्टात हजर राहण्याचे आदेश

वकिलांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवल्याचा आरोप

वकिलांनी दाखल केली होती चित्रपटावर मनाई हुकूम मिळण्याची याचिका

पुणे, (प्रतिनिधी): आगामी 'जॉली एलएलबी ३' चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील कलाकार अक्षयकुमार आणि अर्शद वारसी यांना पुणे न्यायालयाने २८ ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वकिलांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली हे समन्स बजावण्यात आले आहे.

पुण्यातील वकील ॲड. वाजेद खान (बिडकर) आणि ॲड. गणेश म्हस्के यांनी या चित्रपटावर मनाई हुकूम मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाच्या टीझरमध्ये अक्षयकुमार आणि अर्शद वारसी यांनी वकिलांचा बॅण्ड (बो) घालून प्रमोशन केले असून, त्यामुळे वकिलांची प्रतिमा मलीन झाली आहे. तसेच, चित्रपटातील कथानकात वकील आणि न्यायाधीशांवर असभ्य भाषेत विनोद करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत दिवाणी न्यायाधीश जे. जी. पवार यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि कलाकारांना समन्स बजावले आहे. येत्या २८ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी होणार आहे.



  • Jolly LLB 3

  • Akshay Kumar

  • Arshad Warsi

  • Pune Court

  • Controversy

#AkshayKumar #ArshadWarsi #JollyLLB3 #PuneCourt #Controversy #Bollywood

अभिनेता अक्षयकुमार आणि अर्शद वारसी यांना पुणे न्यायालयाचा दणका अभिनेता अक्षयकुमार आणि अर्शद वारसी यांना पुणे न्यायालयाचा दणका Reviewed by ANN news network on ८/२०/२०२५ ०४:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".