मुंबई-गोवा महामार्ग आणि ४ रेल्वेस्थानकांवर आरोग्य तपासणी केंद्र
प्रत्येक पथकात प्रशिक्षित कर्मचारी आणि रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध
जिल्हा प्रशासन चाकरमान्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी कटिबद्ध – सीईओ वैदेही रानडे
रत्नागिरी, (प्रतिनिधी): गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीकरिता मुंबई-गोवा महामार्गावरील प्रमुख १६ ठिकाणी, तसेच खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी या ४ रेल्वेस्थानकांवर आरोग्य तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत. आजपासून ७ सप्टेंबरपर्यंत ही पथके कार्यरत राहणार आहेत.
जिल्ह्यात एकूण २० तपासणी पथके असून, खेड आणि रत्नागिरी तालुक्यात प्रत्येकी तीन, संगमेश्वरमध्ये पाच, चिपळूणमध्ये सहा, लांज्यात दोन, तर राजापुरात एक पथक कार्यरत आहे. प्रत्येक पथकात प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, आवश्यक औषधे आणि प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी प्रत्येक केंद्रावर एका रुग्णवाहिकेची सोय करण्यात आल्याचे रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.
चाकरमान्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.
Ratnagiri
Ganeshotsav
Health Check-up
Mumbai-Goa Highway
Travelers
#Ratnagiri #Ganeshotsav #Konkan #MumbaiGoaHighway #HealthCare
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: