हिंगोली, (प्रतिनिधी): हिंगोली रेल्वे स्टेशनवर गेल्या काही महिन्यांपासून उभ्या असलेल्या रेल्वे बोगीला ६ ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एक संपूर्ण बोगी जळून खाक झाली.
रेल्वे स्टेशनवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग वाढत असल्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पालिकेच्या अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला, परंतु एका बंबातील पाणी कमी पडल्याने आणखी एका बंबाची मदत घेण्यात आली.
सुमारे एक तास अग्निशमन विभागाने केलेल्या अथक प्रयत्नांनंतर ही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे रेल्वे स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली होती.
Hingoli Fire
Railway Bogie Fire
Train Fire
Hingoli Railway Station
#Hingoli #RailwayFire #TrainFire #HingoliNews #FireIncident #RailwayStation
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: