‘एससी-एसटी’ आणि बलात्कारासारखे २९ खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप सिद्ध
आरोपी वकील परमानंद गुप्ताला ५.१० लाख रुपयांचा दंड; बार कौन्सिलकडे कारवाईसाठी निर्देश
लखनऊ : बनावट कागदपत्रे आणि खोटे साक्षीदार वापरून ‘एससी-एसटी’ आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल करणाऱ्या एका वकिलाला लखनऊच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी वकील परमानंद गुप्ता याला २९ बनावट गुन्हे दाखल केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.
त्याच्यावर ५.१० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी ही शिक्षा सुनावली. आरोपी वकिलाने एका मालमत्तेच्या वादातून एका दलित महिलेला हाताशी धरून, दोन भावांविरुद्ध बनावट बलात्कार आणि ‘एससी-एसटी’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासात हा गुन्हा पूर्णपणे खोटा असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर, पुढील तपासात परमानंद गुप्ताने एकूण २९ बनावट गुन्हे दाखल केल्याचे समोर आले.
या निकालानंतर न्यायालयाने उत्तर प्रदेश बार कौन्सिलला या निर्णयाची प्रत पाठवण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून आरोपी वकिलावर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
Lucknow
Lawyer
Life Imprisonment
False Cases
SC-ST Act
#Lucknow #Lawyer #LifeImprisonment #FalseCases #SCSTAct #Justice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: