राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनची मोहीम

 


पुणे, (प्रतिनिधी): प्रजासत्ताक दिनानिमित्त वापरल्या जाणाऱ्या राष्ट्रध्वजांचा नंतर अवमान होऊ नये यासाठी 'भारत फ्लॅग फाऊंडेशन'ने पुढाकार घेतला आहे. नागरिकांना आणि संस्थांना आवाहन करण्यात आले आहे की, रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज आढळल्यास ते सन्मानपूर्वक जमा करावेत.

फाऊंडेशनचे संस्थापक गिरीश मुरुडकर यांनी सांगितले की, '१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला अनेकजण अभिमानाने राष्ट्रध्वज वापरतात, पण त्याच दिवशी हे छोटे ध्वज रस्त्यावर किंवा कचऱ्यात पडलेले दिसतात. विशेषतः प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्ट होत नाहीत, त्यामुळे त्यांचा अनेक दिवस अवमान होतो. तसेच, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे हे कायद्याने गुन्हा आहे.'

या मोहिमेचे हे २४ वे वर्ष आहे. जमा झालेल्या ध्वजांची शास्त्रशुद्ध आणि सन्मानपूर्वक पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. मोहिमेत सहभागी होण्यासाठी फाउंडेशनतर्फे मोफत माहितीपत्रके आणि बॉक्स दिले जातात. भारत फ्लॅग फाऊंडेशन, मुरुडकर झेंडेवाले, पासोड्या मारुती मंदिरासमोर, बुधवार पेठ, पुणे येथे हे ध्वज जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



  • Bharat Flag Foundation

  • National Flag

  • Flag Disrespect

  • Pune Initiative

  • Girish Murudkar

 #BharatFlagFoundation #NationalFlag #FlagRespect #PuneNews #RepublicDay #GirishMurudkar

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनची मोहीम राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनची मोहीम Reviewed by ANN news network on ८/०८/२०२५ ०१:२६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".