पुणे, दि. ६ ऑगस्ट २०२५: बोपोडी येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला आणि सर्व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने ब्र.कु. डॉ. त्रिवेणी बहीरट यांचा जाहीर नागरी सत्कार सोहळा रविवार, दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्यांना नुकतीच कॅनेडी युनिव्हर्सिटीतर्फे 'डॉक्टरेट ऑफ फिलॉसफी इन स्पिरिच्युअल सायन्स' ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे.
डॉ. त्रिवेणी बहीरट यांनी काउंसिलिंग, स्पिरिच्युअल हेल्थ, अल्टरनेटिव्ह मेडिसिन, मॅग्निफाइड हीलिंग आणि सुजोक थेरपी यांसारख्या अनेक विषयांमध्ये उच्च शिक्षण आणि प्रशिक्षण घेतले आहे. तसेच, अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संस्थांकडून त्यांना सन्मानही प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा नागरी सत्कार करून गौरव करण्यात येणार आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला, बोपोडी येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, स्थानिक मान्यवर आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. आयोजकांनी सर्वांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Dr. Triveni Didi Bahirat, Civic Felicitation, Bopodi, Pune, Dr. Sarvepalli Radhakrishnan School.
#TriveniDidiBahirat #Pune #Bopodi #Felicitation #HonoraryDoctorate #SpiritualScience #Education

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: