नायट्रोजन रिॲक्शन टँकमधील गळतीमुळे अपघात; दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू
मृतांमध्ये पालघर, डहाणू आणि बिहारमधील कामगारांचा समावेश
औद्योगिक वसाहतीतील घटनेने परिसरात खळबळ
बोईसर, (प्रतिनिधी): बोईसर औद्योगिक वसाहतीतील मेडली फार्मा कंपनीत गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान झालेल्या वायू गळतीच्या अपघातात चार कामगारांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नायट्रोजन रिॲक्शन टँकमध्ये ही गॅस गळती झाल्याने अपघात घडला. जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
या अपघातात मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आणि तपशील खालीलप्रमाणे आहेत:
कल्पेश राऊत: वय ४३, रा. चिंचणी, ता. डहाणू.
बंगाली ठाकूर: वय ४६, रा. अथमलगोला, पटना (बिहार).
धीरज प्रजापती: वय ३१, रा. शिवाजीनगर, सालवड (बोईसर).
कमलेश यादव: वय ३१, रा. शिवाजीनगर, सालवड (बोईसर), मूळगाव आझमगढ (उत्तर प्रदेश).
जखमी कामगारांची नावे अशी आहेत:
रोहन शिंदे: वय ३५, रा. सरावली, बोईसर.
निलेश चंद्रकांत हाडळ: वय ३७, रा. पालेगावठाण पाडा आगवन, ता. डहाणू.
Boisar
Gas Leak
Medley Pharma
Industrial Accident
Palghar
#Boisar #GasLeak #IndustrialAccident #Palghar #Maharashtra #MedleyPharma

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: