मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट
शिवाजी महाराजांचा पुतळा आणि पगडी देऊन पंतप्रधानांचा सन्मान
पिंपरी, (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केल्याबद्दल मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
या भेटीदरम्यान, खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदी यांचा पगडी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देऊन सन्मान केला. या ऐतिहासिक निर्णयात महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून, यामुळे पर्यटन, स्थानिक रोजगार आणि राज्याच्या सांस्कृतिक ओळखीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.
यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव, शिवसेनेचे गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, रविंद्र वायकर, नरेश म्हस्के, आणि मिलिंद देवरा उपस्थित होते.
Chhatrapati Shivaji Maharaj Forts
UNESCO World Heritage
Shiv Sena MPs
Narendra Modi
Maharashtra
#ChhatrapatiShivajiMaharaj #UNESCO #WorldHeritage #Maharashtra #ShivSena #NarendraModi

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: