विकसित भारताचं स्वप्न महिलांच्या सहभागातूनच साकार होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोगाच्या ‘शक्तिसंवाद’ कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महिलांचा सन्मान पुस्तकातून नव्हे, तर कृतीतून शिकवण्यावर मुख्यमंत्र्यांनी दिला भर

सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा मार्ग लिंग-समतूतून जातो: मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी): आपल्या समाजाचा ५० टक्के भाग असलेल्या महिला जेव्हा विकासाच्या प्रवासाचा भाग होतील, तेव्हाच विकसित भारताचं स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोगाने आयोजित केलेल्या ‘शक्तिसंवाद’ या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा रस्ता लिंगसमतेतून जातो, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र आणि राज्य सरकारने महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, महिलांचा सन्मान केवळ पुस्तकातून शिकवून चालणार नाही, तर आपल्या वागणुकीतून घरातल्या लहान मुलांनाही तो शिकवायला हवा.

यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, मंत्री अदिती तटकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.



  • Shakti Samvad

  • Women Empowerment

  • Devendra Fadnavis

  • National Women's Commission

  • Maharashtra

 #ShaktiSamvad #WomenEmpowerment #DevendraFadnavis #Maharashtra #WomenCommission

विकसित भारताचं स्वप्न महिलांच्या सहभागातूनच साकार होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकसित भारताचं स्वप्न महिलांच्या सहभागातूनच साकार होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Reviewed by ANN news network on ८/२३/२०२५ ०७:३८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".