मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले दुःख; मृतांच्या कुटुंबांना ४ लाखांची मदत जाहीर
राज्य सरकारकडून जखमींच्या उपचाराचा खर्च उचलणार
गडचिरोली, (प्रतिनिधी): गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ काल सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखून धरत आपला संताप व्यक्त केला.
प्राथमिक माहितीनुसार, एका भरधाव ट्रकने विद्यार्थ्यांना धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात जखमी झालेल्या दोघांना तातडीने उपचारासाठी हवाईमार्गे नागपूरला नेण्यात आले आहे.
या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींच्या उपचाराचा खर्चही राज्य सरकार उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Gadchiroli Accident
Student Deaths
Truck Crash
Devendra Fadnavis
Road Protest
#Gadchiroli #Accident #RoadSafety #StudentAccident #Maharashtra #DevendraFadnavis
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: