पुणे-लोणावळा लोकल दुपारच्या वेळेत सुरू करणे अशक्य; रेल्वेमंत्र्यांनी दिले देखभाल-दुरुस्तीचे कारण

 

खासदार बारणे यांना लेखी पत्राद्वारे माहिती

दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही मागणीला नकारात्मक प्रतिसाद

पिंपरी, (प्रतिनिधी): पुणे-लोणावळा लोकल सेवा सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच या वेळेत पुन्हा सुरू करण्याची मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी रेल्वे मंत्रालयाने फेटाळली आहे. रेल्वे ट्रकच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी दुपारी १२ ते ३ या वेळेत लोकल सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार बारणे यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे.

कोरोना महामारीपूर्वी या वेळेत दोन लोकल गाड्या चालवल्या जात होत्या, ज्यांचा लाभ हजारो विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी आणि पर्यटकांना मिळत होता. पिंपरी-चिंचवड आणि तळेगावमधील औद्योगिक वसाहतींमधील दुसऱ्या शिफ्टच्या कामगारांसाठी या लोकल सेवा अत्यंत महत्त्वाच्या होत्या. याच पार्श्वभूमीवर खासदार बारणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी ७ डिसेंबर २०२३ रोजी तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना, तर २० मे २०२५ रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र दिले होते.

यावर ११ ऑगस्ट रोजी रेल्वेमंत्री वैष्णव यांनी लेखी उत्तर देत देखभाल-दुरुस्तीच्या कामाचे कारण देत दुपारच्या वेळेत लोकल सेवा सुरू करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.



  • Pune-Lonavala Local

  • Indian Railways

  • Shrirang Barne

  • Ashwini Vaishnaw

  • Commuters

 #PuneLonavala #IndianRailways #RailwayNews #Pune #Lonavala #Commute

पुणे-लोणावळा लोकल दुपारच्या वेळेत सुरू करणे अशक्य; रेल्वेमंत्र्यांनी दिले देखभाल-दुरुस्तीचे कारण पुणे-लोणावळा लोकल दुपारच्या वेळेत सुरू करणे अशक्य; रेल्वेमंत्र्यांनी दिले देखभाल-दुरुस्तीचे कारण Reviewed by ANN news network on ८/१८/२०२५ ०३:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".