'कहना क्या चाहते हो?' या संवादाने तुफान लोकप्रियता; १०० हून अधिक चित्रपटांत काम
भारतीय लष्कर आणि इंडियन ऑईलमध्ये काम केल्यानंतर अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण
ठाणे : 'थ्री इडीयट्स' या लोकप्रिय चित्रपटातील 'कहना क्या चाहते हो?' या संवादासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ चरित्र अभिनेते अच्युत पोतदार यांचे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात काल रात्री निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.
मध्यप्रदेशातील एका मराठी भाषिक कुटुंबात जन्मलेले पोतदार यांचे शिक्षण इंदूरमध्ये झाले. सुरुवातीला प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर ते भारतीय सैन्यात भरती झाले आणि कॅप्टन म्हणून १९६७ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर इंडियन ऑईलमध्ये नोकरी करत असताना त्यांनी अभिनयाचा छंद जोपासला.
पोतदार यांनी १९८० मध्ये 'आक्रोश' आणि 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है' या चित्रपटांतून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 'अर्धसत्य', 'नासूर', 'तेजाब', 'प्रहार', 'वंश', 'चमत्कार', 'रंगीला', 'अग्निसाक्षी' आणि 'परिणीता' अशा तब्बल सव्वाशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या. तसेच, ९५ दूरचित्रवाणी मालिका आणि २६ नाटकांमध्येही त्यांनी काम केले.
Achyut Potdar
Veteran Actor
Demise
Bollywood
Marathi Theatre
#AchyutPotdar #Bollywood #VeteranActor #Demise #Thane
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: