तेजज्ञान फाउंडेशनतर्फे 'छोटे यकीन का बडा जादू' कार्यक्रम
पुणे येथे १८०० हून अधिक लोकांचा प्रत्यक्ष, तर १३५००+ लोकांचा ऑनलाइन सहभाग
पुणे, (प्रतिनिधी): 'लहान लहान विश्वासही आपल्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवतात. त्यामुळे माणसाने नदीच्या पाण्याप्रमाणे प्रवाही व्हायला शिकले पाहिजे,' असे आवाहन तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक सरश्री यांनी केले. फाउंडेशनतर्फे पुणे येथील मनन ज्ञान ध्यान केंद्र, सिंहगड रोड येथे 'छोटे यकीन का बडा जादू' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, १८०० हून अधिक लोकांनी यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला, तर १३,५०० हून अधिक लोक ऑनलाइन सहभागी झाले होते. कार्यक्रमात सरश्री यांनी कल्पना चावला यांचे उदाहरण देऊन सांगितले की, 'ज्याला आपण करू शकत नाही, असे वाटते, वास्तवात काहीही अशक्य नाही.'
सरश्री यांनी विविध कहाण्या आणि दृक्श्राव्य माध्यमांचा उपयोग करून उपस्थितांच्या मनावर बिंबवले की, स्वतःवर ठाम विश्वास असल्यास काहीही करणे अशक्य नाही. नियमित ध्यानसाधना केल्याने नकारात्मक विचारांकडून सकारात्मक विचारांकडे वळता येते, असे सांगून त्यांनी उपस्थितांना २१ दिवस ध्यानसाधनेचा सराव सुरू ठेवण्याचे आवाहन केले. संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त तेजविद्या यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Sirshree
Tejgyan Foundation
Pune
Motivation
Meditation
Positive Thinking
#Sirshree #TejgyanFoundation #Pune #Motivation #Meditation #PositiveThinking #PersonalDevelopment

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: