थकबाकीदारांकडून ९६ कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट
२० ऑगस्ट ते २० सप्टेंबर या काळात मोहीम राबवणार
वारंवार आवाहन करूनही कर न भरल्याने प्रशासनाचा कठोर निर्णय
पिंपरी, (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. ५ लाखांवरील थकबाकीदारांवर २० ऑगस्ट ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत जप्तीची कारवाई केली जाणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत या कारवाईचे निर्देश दिले.
शहरात ५ लाखांवरील एकूण ६९९ थकबाकीदार असून, त्यांच्याकडे मिळून ९६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वारंवार सूचना देऊनही कर न भरल्याने ही मोहीम राबवण्यात येत आहे. विभागीय कार्यालयनिहाय पथके तयार करण्यात आली असून, थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर थेट मालमत्ता जप्तीची कारवाई होणार आहे.
विभागनिहाय थकबाकीदारांची संख्या:
चिखली: १२८
कस्पटे वस्ती: ११७
वाकड: ९१
थेरगाव: ८२
मनपा भवन: ५१
सांगवी: ३०
पिंपरी वाघेरे: २९
आकुर्डी: २२
मोशी: २०
भोसरी: १८
चिंचवड: ३५
किवळे: ३४
फुगेवाडी दापोडी: १०
चर्होली: ८
दिघी बोपखेल: ८
निगडी प्राधिकरण: ७
तळवडे: ५
पिंपरी नगर: ४
या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले की, “५ लाख रुपयांवरील मालमत्ता कर थकबाकीदारांवर कोणतीही शिथिलता न दाखवता थेट जप्ती कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी वेळेत थकबाकी भरून कठोर कारवाई टाळावी.”
PCMC
Property Tax
Tax Defaulters
Pimpri-Chinchwad
Seizure Action
#PCMC #PimpriChinchwad #PropertyTax #TaxDefault #SeizureAction #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: