पिंपरी, (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्या (डीपी प्लॅन) संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेला मोर्चा म्हणजे केवळ जनतेची दिशाभूल करणारी आणि 'राजकीय नौटंकी' असल्याचा आरोप 'आम आदमी पक्षा'चे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केला आहे. दोन महिने शांत बसल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला अचानक जाग आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रविराज काळे यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचा हा नकली आक्रोश आहे. या मोर्चातून ते महायुती सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण याआधी, जनतेच्या प्रश्नांवर हे नेते गप्प का होते? डीपी आराखड्यासाठी ६० दिवसांच्या कालावधीत त्यांनी एकही निवेदन दिले नाही किंवा एकही बैठक घेतली नाही. आता अचानक रस्त्यावर मोर्चा काढणे, ही लोकांच्या बुद्धीची परीक्षा आहे की त्यांचा समजूत काढण्याचा विनोदी प्रयत्न, असा प्रश्न उपस्थित होतो.
काळे यांनी पुढे म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस नाटक करत आहे आणि महायुती सरकार केवळ डायलॉगबाजी करत आहे. या दोन्ही पक्षांना शहराच्या गरजा आठवत नाहीत. शहराच्या विकासावर महायुती सरकार राजकारण करत आहे आणि यात सामान्य नागरिक भरडला जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
Pimpri Chinchwad
AAP
NCP
DP Plan
Raviraj Kale
#PCMC #DPPlan #PimpriChinchwad #AAP #NCP #MaharashtraPolitics

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: