ॲपद्वारे जून २०२५ मध्ये १२,११० कोटी रुपयांचे व्यवहार; वापरात २१२% वाढ
एनपीसीआय भीम सर्व्हिसेस लिमिटेडने विकसित केले ॲप; मराठीसह १५ भाषांची सुविधा‘खर्च विभागणी’, ‘कुटुंब मोड’ आणि ‘यूपीआय सर्कल’ यांसारखी नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट
पुणे, (प्रतिनिधी): एनपीसीआय भीम सर्व्हिसेस लिमिटेडने (NBSL) विकसित केलेले भीम पेमेंट्स ॲप तंत्रज्ञानातील नावीन्यता आणि साधेपणाचा संगम साधत भारतातील डिजिटल पेमेंट्सची नवी व्याख्या घडवत आहे. या ॲपमध्ये मराठीसह १५ पेक्षा जास्त भारतीय भाषांची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे शहरी, ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागांतील वापरकर्त्यांसाठी डिजिटल व्यवहार करणे अधिक सोपे झाले आहे.
या ॲपचा वापर आणि पोहोच सातत्याने वाढत आहे. जून २०२५ मध्ये या ॲपमार्फत ७९.५८ दशलक्ष व्यवहार झाले, ज्यांची एकूण किंमत ₹१२,११० कोटी होती. जून २०२४ च्या तुलनेत व्यवहारांच्या संख्येत सुमारे २१२% आणि मूल्यामध्ये ४६% वाढ झाली आहे.
या ॲपमध्ये आता ‘खर्च विभागणी’ (Expense Splitting), ‘कुटुंब मोड’ (Family Mode), ‘खर्च विश्लेषण’ (Expense Analysis) आणि ‘युपीआय सर्कल’ (UPI Circle) यांसारखी नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. यामुळे वापरकर्त्यांना आर्थिक व्यवहार अधिक संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यास मदत होईल.
एनबीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ललिता नटराज यांनी सांगितले की, “भीम पेमेंट्स ॲप हे आजच्या जलद विकसित होत असलेल्या डिजिटल पेमेंट्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केले आहे. यामुळे कमी कनेक्टिव्हिटी असलेल्या भागांतही लहान-मूल्य व्यवहार सहज पार पाडून रोख रकमेवरील अवलंबित्व कमी होईल.”
BHIM App
Digital Payments
NPCI
Financial Inclusion
Innovation
#BHIMApp #DigitalPayments #NPCI #UPI #FinancialInclusion #India

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: